नववीत शिकणाऱ्या विद्यार्थींने घेतला टोकाचा निर्णय

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील केऱ्‍हाळे येथील नववीच्या विद्यार्थिनीने शनिवारी रात्री ८ वाजेच्या पूर्वी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली आत्महत्येच कारण अद्याप समजले नाही.

मयत नंदिनी महाजन ही भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करणारी आपली आजी निर्मला महाजन यांच्याकडे राहत होती. दरम्यान, निर्मला महाजन बाहेरगावहून भाजीपाला विक्री करून रात्री ८ वाजता घरी परतल्यावर दरवाजे बंद आढळले. त्यांनी शेजारील घराच्या छतावरून जाऊन जिन्याद्वारे स्वतःच्या घरात प्रवेश केला. यावेळी नात (मुलीची मुलगी) नंदिनीने गळफास घेतल्याचे दिसले.याबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Protected Content