सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा ९० वा वर्धापन दिन साजरा

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा  ९० वा वर्धापन दिन शनिवार दि. १५ ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे साजरा करण्यात आला.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा  ९० वा वर्धापन दिननिवासी उपजिल्हाधिकारी  राहुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी अध्यक्षीय मनोगतात राहुल पाटील यांनी सामाजिक न्याय विभाग हा वंचितांना भारतीय संविधानाने दिलेले अधिकारांचा खरा संरक्षक व पहारेकरी असल्याचे प्रतिपादन केले.  यावेळी मान्यवरांचे हस्ते सामाजिक न्याय विभगाच्या वतीने राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवाडा (कर्तव्यपथ) या माहितीपर पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. मंचावर समाज कल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील ,  ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष  दत्तात्रय चौधरी,  प्रा. गणेश सुर्यवंशी उपस्थित होते.

प्रास्ताविक  योगेश पाटील यांनी केले. यावेळी  प्रमुख व्याख्याते प्रा. गणेश सुर्यवंशी यांनी त्यांच्या जीवनातील सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनेच्या घेतलेला लाभ व त्यामुळे त्यांच्या जीवनात झालेला बदल याविषयी माहिती दिली. तसेच विशेष करुन त्यांच्या शैक्षणिक जीवनात वसतिगृहाचे महत्त्व कसे अनमोल ठरले याबाबत देखील उल्लेख केला. तसेच प्रमुख व्याख्याते दत्तात्रय चौधरी यांनी आपल्या मनोगतात समाज कल्याण विभागाचे आभार मानत तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत लाभ देत असून त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी महत्त्वाची भूमीका बजावत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमात शाहू महाराज परदेश शिक्षण शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी उपाली चंद्रमनी लभाने व विजय राजाराम सुरवाडे यांनी सिडनी युनिवर्सिटी (ऑस्ट्रेलिया) येथून चित्रफित पाठवून विभागाचे आभार मानत शुभेच्छा दिल्या. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेचे लाभार्थी देविदास छगन निकम यांनी स्वत: कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांचे जीवनमानात कसा बदल झाला हे आपले मनोगत व्यक्तकेले. दिव्यांग व्यक्तींना शासकीय जमीन योजनेतील लाभार्थी  महेंद्र सोनवणे यांनी लाभ मिळाल्यामुळे स्वत: व्यवसाय सुरु केल्याचे समाधान व्यक्त केले.  तसेच सदर कार्यक्रमात ४  विद्यार्थ्यांना  जात वैधता  प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन अनिल पगारे, तालुका समन्वयक यांनी केले. स्वागत गीत मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलीचे शासकिय वसतिगृह  जळगाव येथील विद्यार्थीनींनी केले, तर आभार कार्यालय अधिक्षक राजेंद्र कांबळे  यांनी मानले. यशस्वीतेसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, जिल्हा जातपडताळणी  कार्यालय व विविध महामंडळे यांचे सर्व अधिकारी, कर्मचारी व तालुका समन्वयक यांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content