महापौर, उपमहापौर निवडणुकीत वाद रंगले

जळगाव प्रतिनिधी । आज होत असलेल्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मतदानाआधीच मोठ्या प्रमाणात वाद झाले असून यामुळे आता या निवड प्रक्रियेबाबत उत्सुकता ताणली गेली आहे.

याबाबत वृत्त असे की, आज पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखालील सभेत महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक होत आहे. यात अ‍ॅड. सुचीता हाडा यांनी यांनी उमेदवारीबाबत आक्षेप घेतले. मात्र जिल्हाधिकार्‍यांनी ही आक्षेप फेटाळून लावले. याप्रसंगी सभागृहात वाद झाल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडी प्रसंगी प्रसारमाध्यमांना सभागृहात येऊ न दिल्यामुळे यात नेमके काय सुरू आहे हे जाणून घेण्यात अडचणी येत आहेत. मात्र आता जयश्री महाजन, प्रतिभा कापसे यांचे अर्ज वैध ठरले आहेत.

Protected Content