खंडेराव नगर रेल्वे बोगद्याजवळ महिलेचा रेल्वेखाली मृत्यू

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील खंडेरावनगर रेल्वे बोगद्याजवळ रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवार १३ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.

आशाबाबानगर रेल्वे बोगदा ते खंडेरावनगर रेल्वे बोगद्यादरम्यान रेल्वेरुळावर अनोळखी महिलेचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची माहिती रामानंदनगर पाेलिसांना मिळाली. त्यानुसार हेडकॉन्स्टेबल अजित पाटील यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठून महिलेचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

असे आहे मयत महिलेचे वर्णन
मयत महिलेचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष गडद निळ्या रंगाचा टॉप, त्यावर सफेद रंगाची बारीक डिझाइन सफेद रंगाची लॅगीज पँट असे महिलेचे वर्णन आहे. या वर्णनावरून महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

Protected Content