लाच घेणाऱ्या मुख्याधिकारी तडवी यांच्या निषेधाच्या ठरावाला आवाजी मतदानाने मंजूरी

यावल प्रतिनिधी । यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बबन तडवी लाचप्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांच्यामुळे पालिकेची व शहरातीची नाचक्की झाल्याने मुख्याधिकारी यांच्या निषेधाचा ठराव पालिकेचे नगरसेवक राकेश कोलते यांनी मांडला. त्याला सभेला उपस्थित सदस्यांनी आवाजी मतदानाने मंजूरी दिली आहे. 

यावल पालिकेच्या सव्वाशे वर्षाच्या कार्यकाळात प्रथमच पालिकेचे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी कामाची वर्क ऑर्डर मिळवून देण्यासाठी ठेकेदाराकडून २८ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी त्यांना अटक झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेमुळे पौराणिक व ऐतिहासीक वारसा लाभलेल्या यावल शहरात पालिकेसह संपूर्ण शहराची नाचक्की झाली आहे. मुख्याधिकारी बबन तडवी याचा निषेधाचा ठराव पालिकेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा विद्दमान नगरसेवक राकेश कोलते यांनी मांडला. त्यास सर्वसाधाराण सभेला उपस्थित सदस्यांनी आवाजी मतदानाने मंजूरी दिली. 

येथील पालिकेची सर्व साधारण सभा आज सकाळी नगराध्यक्ष नौशाद तडवी यांचे अध्यक्षतेखाली ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. आजच्या सर्वसाधारण सभेला एकूण चाळीस विषय चर्चेला ठेवण्यात आले होते. यात सन२०२१ -२२साठी “माझी वसुंधरा अभियान २ ” अंतर्गत विविध कामे करणेबाबत विचार विनिमय करणे या विषयावर माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी विविध कामे म्हणजे कोणती कामे याचा स्पष्ट उल्लेख विषयात अथवा मुख्याधिकाऱ्यांच्या टिपणीतही उल्लेख नाही. मोघम विषय घेतला असून, त्यामुळे विषयावरुन स्पष्ट असे आकलन होत नसल्यामुळे हा विषय स्थगीत ठेवण्याची मागणी अतुल पाटील यांनी केली. त्यास उपस्थित सदस्यांनी मंजूरी दिली.  माझी वसुंधरा २ अंतर्गत यावल शहरात झालेल्या विविध विकास कामांची चौकशी करण्यात यावी. गेल्या आर्थिक वर्षात २५ते ३० लाख रुपये खर्च या योजनेवर झाला आहे. त्या कामांची चौकशी करण्यात यावी. कामे पारदर्शी झाले नाहीत. आपल्या मर्जीतील ठेकेदारास काम मिळावे म्हणून विकास कामांचे तुकडे करुन प्रत्येकी तीन लाखाचे आत टेंडर काढून कामे करुन घेतली असल्याचा आरोप अतुल पाटिल यांनी केला आहे. सभेला ठेवण्यात आलेल्या ४०विषयांपैकी दोन विषय स्थगीत ठेऊन उर्वरित ३८ विषय मंजूर करण्यात आले. सभेच्या कामकाजात प्रभारी मुख्याधिकारी विजय बडे यांना राजेंद्र गायकवाड, योगेश मदने यांनी सहकार्य केले.

Protected Content