राष्ट्रीय भिमसेनेतर्फे महागाई विरोधात आंदोलन (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । पेट्रोल डीझल, गॅस, जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढी बाबत व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव ओझर नाशिक विमान तळाला देण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय भिमसेना भिम आर्मीतर्फे आंदोलन करण्यात आले. 

वाढती महागाई व  कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव ओझर नाशिक विमान तळाला देण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य नेते संजय सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी संजय सपकाळे यांनी सांगितले की, मागील दोन वर्षांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असतांना लॉक डाऊनमुळे लोक त्रस्त झालेले असतांना, सामान्य जनता रस्त्यावर आलेली आहे. लोकांच्या हाताला काम धंदा नाही. याकाळात  जनजीवन विस्कळीत झाले आहे. यात नागरिक त्रस्त झाले असतांना केंद्र सरकार खाद्य तेलापासून ते जीवनाश्यक वस्तू पर्यंत सर्वांची दर वाढ केल्याने सर्वसामन्य त्रस्त झालेले आहेत. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे. त्यांनी यावेळी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव ओझर नाशिक विमान तळाला देण्यात यावे अशी मागणी देखील केली.   याप्रसंगी जिल्हाध्यक्ष वाल्मिक जाधव, रावेर विभागीय अध्यक्ष प्रशांत तायडे, जिल्हा सचिव श्रीराम सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष सुरेश बोदडे, दिलीप सपकाळे, असलम शेख, मुकद्दर तडवी, एच. बी. शाह, चंद्रकांत चोपडे आदी उपस्थित होते.

 

Protected Content