Home Cities जळगाव नागरिकांच्या तक्रारीनंतर संगम सोसायटीलगतच्या नाल्याची पाहणी

नागरिकांच्या तक्रारीनंतर संगम सोसायटीलगतच्या नाल्याची पाहणी

0
43

जळगाव, प्रतिनिधी । रिंगरोड़ येथील लॉ कॉलेज परिसरातील संगम सोसायटी लगत शहरातील मुख्य नाल्याची सफाई होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. या तक्रारीनुसार आज उपयुक्त मिनीनाथ दंडवते यांनी पाहणी करून २ ते ३ दिवसात काम सुरु करण्याचे आश्वासन दिले.

आज उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांनी प्रभाग अधीकारी व्ही. ओ. सोनवणी तसेच आरोग्य अधीक्षक अत्तरदे व एसआय सूरज यांच्या सोबत परिसराची पाहणी केली. यावेळी संगम सोसायटी जवळील नाल्याचे बांधकाम हे अपूर्ण ठेवण्यात आलेले आहे. यामुळे परिसरात मोठे साप रस्त्यावर येतात आणि राहिवाश्याना जीव मुठीत घेऊन राहावे लागत असल्याची तक्रार करण्यात आली. नाल्याचे बांधकाम लवकर सुरु करण्यात यावे अशी मागणी केली असता २ ते ३ दिवसांत नाला सफाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.


Protected Content

Play sound