जिल्ह्यात आज ३६५ पॉझिटीव्ह तर ३६२ रूग्णांनी केली कोरोनावर मात !

जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात तब्बल ३६५ पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असले तरी आजच ३६२ रूग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. दरम्यान, आजही जळगावात सर्वाधीक रूग्ण असून शहरातील आजवरच्या रूग्ण संख्येने तीन हजारांचा आकडा पार केल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कायमच असल्याचे दिसून आले आहे. मात्र त्यासोबत आता बरे होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात ३६५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. तर दुसरीकडे आजच ३६२ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज १३ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जारी केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात ३६५ कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ९२ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल चोपडा-४५, चाळीसगाव-३४ असे आहे. उर्वरित तालुक्याचा विचार केला असता, जळगाव ग्रामीण-२९, भुसावळ-२८, अमळनेर-२९, पाचोरा-३०, भडगाव-१५, धरणगाव-७, यावल-७, एरंडोल-४, जामनेर-१५, रावेर-१५, पारोळा-८, बोदवड-५, अन्य जिल्हा-१ असे एकुण ३६५ रूग्ण आज आढळून आले आहे.

तालुकानिहाय एकुण रूग्णसंख्या
जळगाव शहर- ३००२, जळगाव ग्रामीण-५७९, भुसावळ-९३१, अमळनेर-७६६, चोपडा-८३२, पाचोरा-४४८, भडगाव-४५७, धरणगाव-५२५, यावल-४७१, एरंडोल-५०७, जामनेर-८३०, रावेर-७११, पारोळा-४८९, चाळीसगाव-५६३, मुक्ताईनगर-३४९, बोदवड-२४९, इतर जिल्हे-४४ असे एकुण ११ हजार ७५३ रूग्ण आढळले आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ८ हजार २०३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. बाधितांपैकी ३ हजार १० रूग्ण उपचार घेत असून आजपर्यंत ५४० रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

Protected Content