फैजपूर येथे “एक दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन व चर्चासत्रा”चे उद्घाटन

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील धनाजी नाना महाविद्यालयात रविवारी कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ प्राचार्य परिषदेच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण “उच्च शिक्षणातील योग्य परिवर्तन” या विषयावर आयोजित एका दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन व चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात आले. स्व.धनाजी नाना चौधरी यांच्या पुतळ्यास अभिवादन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.

 

याप्रसंगी परिषदेचे उद्घाटन सत्राचे अध्यक्ष: कुलगुरू डॉ.विजय महेश्वरी, स्वागत अध्यक्ष: सन्मा.शिरीषदादा चौधरी आमदार रावेर विधानसभा व अध्यक्ष तापी परिसर विद्या मंडळ फैजपूर, सुकानू समितीचे सदस्य : डॉ.अनिल राव, सह संचालक: डॉ.संतोष चव्हाण, महारष्ट्र राज्य अध्यक्ष : डॉ.अबासाहेब देशमुख, कबचौउमवि प्राचार्य परिषदेचे अध्यक्ष: डॉ.पी.आर.चौधरी, माजी अध्यक्ष प्राचार्य परिषद: डॉ.डी.एल. तोरवणे, माजी सचिव प्राचार्य परिषद : डॉ.व्ही आर पाटील, सचिव : डॉ.अशोक खैरनार,तापी परिसर विद्या मंडळ फैजपूर, संस्थेचे पदाधिकारी एम. टी. फिरके, प्रा. एन. ए. भंगाळे,जी.पी.पाटील, विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयातील बहुसंख्य प्राचार्य, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय निवळ झालेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यात डॉ.अशोक खैरनार अधिष्ठाता मानव्य विद्याशाखा कवियित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा जळगाव येथे निवड, डॉ.मनोहर पाटील- विद्यापरिषद सदस्य पदी निवड, प्राचार्य डॉ.अरविंद चौधरी राज्यपाल नियुक्त विद्यापरिषद सदस्यपदी निवड, डॉ.शिरीष पाटील राज्यपाल नियुक्त विद्यापरिषद सदस्य पदी निवड, डॉ.एस.एम. अधिसभा सदस्यपदी निवड, डॉ. वी.आर.पाटील अधिसभा सदस्य पदी निवड, डॉ.के.जी.पाटील अधिसभा सदस्य पदी निवड, डॉ. एच. ए.महाजन विद्यापरिषद सदस्यपदी निवड, डॉ.के.जी.कोल्हे प्राचार्य पदी निवड, डॉ.लता.मोरे  प्राचार्य पदी निवड, डॉ.आर.आर.आत्तरदे प्राचार्य पदी निवड,डॉ.पी.एस.महाले प्राचार्य पदी निवड, डॉ.अनिल पाटील प्राचार्य पदी निवड, डॉ.एस.जे.साळुंखे प्राचार्य पदी निवड, डॉ.प्रकाश लोहार प्राचार्य पदी निवड, डॉ.मनोहर पाटील, विद्यापरिषद सदस्य पदी निवड, प्राचार्य डॉ.अरविंद चौधरी राज्यपाल नियुक्त विद्यापरिषद सदस्य, डॉ.शिरीष पाटील राज्यपाल नियुक्त विद्यापरिषद सदस्य, डॉ.एस.एम.अधिसभा सदस्य, डॉ. वी.आर.पाटील अधिसभा सदस्य, डॉ.के.जी.पाटील अधिसभा सदस्य,डॉ. एच.ए.महाजन विद्यापरिषद सदस्य व प्राचार्य पदी निवड, डॉ.के.जी.कोल्हे, डॉ.लता.मोरे, डॉ.आर.आर.आत्तरदे, डॉ.पी.एस.महाले, डॉ.अनिल पाटील, डॉ.एस.जे.साळुंखे, डॉ.प्रकाश लोहार प्राचार्य पदी निवड, डॉ.संजय गीरासे, डॉ. होटमारे, डॉ.बाविस्कर, डॉ.एल.पी.देशमुख कार्याध्यक्ष पदी निवड,डॉ.अशोक खैरनार सचिव पदी निवड, डॉ.संध्या सोनवणे कार्याध्यक्षपदी निवड

 

विशेष सन्मान

डॉ.प्रमोद पवार व डॉ.पी.आर चौधरी यांच्या सन्मानार्थ सन्मान पत्राचे वाचन प्राचार्य डॉ.वासुदेव पाटील यांनी केले.

 

मनोगत:

सह संचालक डॉ.संतोष चव्हाण:

परिवर्तनाचा स्वीकार करायचा असेल आणि त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी असेल तर सर्वांनी मिळून मिसळून काम केले पाहिजे.शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न केला जाईल विद्यार्थांच्या विकासात आवश्यक ती सर्व प्रशासकीय मदत उच्च शिक्षण विभाग करायला तयार आहे असे आश्वासन दिले.

 

डॉ. वी.आर.पाटील: माजी सचिव

संस्थेतील सर्व जबाबदारी सांभाळत असताना विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांच्यातला दुवा म्हणून प्राचार्य काम करत असतात त्यांना परिषदेच्या माध्यमातून ऊर्जा मिळावी ही शुभेच्छा  दिल्या.

 

डॉ.शिरीष दादा चौधरी स्वागत अध्यक्ष : समाजाला योग्य दिशा देण्यासाठी शिक्षण हे क्षेत्र अतिशय महत्वाचे आहे.उच्च शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी महाविद्यालयीन प्राचार्यांचा मोलाचं वाटा राहिला आहे म्हणून युवा पिढीसाठी तसेच भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी शिक्षण व्यवस्था तयार व्हावी युवकांना दिशा मिळावी यासाठी आपण यथोचित कार्य करीत राहावे व परिषदेला स्टकर्याचे बळ मिळावे अशी शुभेच्छा दिल्या.

 

डॉ.अनिल राव : सदस्य सुकानु समिती

यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विषयी माहिती देत प्राचार्य परिषदेच्या इतिहासातील अनेक उपक्रम व प्राचार्यांच्या हक्कासाठी केलेले संघर्ष  आणि भविष्यात समोर उभी ठाकलेली आव्हाने यावर मात करण्यासाठी एकसंग राहून लढले पाहिजे असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषण डॉ. व्हीं.एल.महेश्र्वरी यांनी सांगितले विद्यापीठ हे विद्यार्थ्यांचे आहे प्राध्यापकांचे आहे यांच्या समस्या सोडविणे आणि सर्वांना समान न्याय देणे हे विद्यापीठांचे कर्तव्य आहे या सर्व गोष्टींचा विचार करून विद्यापीठ प्रशासन हे नेहमी प्राचार्यांच्या हक्कासाठी पुढाकार घेऊन समस्या सोडविविण्यासाठी परिषदेच्या पाठीशी आहे, शक्य होईल त्याठिकाणी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करून सदैव परिषदेच्या पाठीशी आहे असे आश्वासन कुलगुरू यांनी दिले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी सूत्र संचालन डॉ.शुभांगी पाटील, डॉ.राजेंद्र राजपूत व आभार डॉ.अशोक खैरनार यांनी मानले.

Protected Content