महावितरणाचा भोंगळ कारभार; विद्यूत तारांमुळे नागरीकांचा जीव धोक्यात

yawal 1

यावल प्रतिनिधी । येथील महावितरणाच्या दुर्लक्षित आणि भोंगळ कारभारामुळे शहरातील अनेक वाहतुकीच्या मार्गावर विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा लोंबकळत असल्याने रस्त्यावरील जाणाऱ्या नागरीकांचे जिव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महावितरणच्या अधिकाऱ्यांवी दखल घेतल्यास मोठी जिवीतहानी टाळता येवु शकते. शहरातील विविध टीकाणी विद्युतपुरवठा करणाऱ्या ताराही अत्यांत जिर्ण झाल्या आहे. शहरातील काही भागाता विद्यूत तारा अवघ्या १० ते १२ फुटाच्या उंचीपर्यंत लोंबकळत आहे. या मार्गावरून जाणारे पादचारी व वाहनधारकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. शहरातील वर्दळीच्या मुख्य मार्गावर नगीना मस्जिद चौकात मागीत महीन्यात अचानक विजपुरवठा करणाऱ्या तारा तुटुन झालेल्या अपघातात नगरपालीका कर्मचारी देव बलवत्तर म्हणुन मोठ्या अपघातातुन तो कर्मचारी बचावला.

शहरातील नविन वसाहतीमध्ये गंगानगर कॉलनी समोरील खुल्या भुखंडाच्या जागेवर पादचारी मार्गा असुन, या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरीकांची व प्रसंगी मोठ्या वाहना नेहमीच जातात याच मार्गावर विद्युतपुरवठा करणारी तारे ही अत्यंत धोकादायक अवस्थेत खाली लोबंकत असल्याने रात्रीच्या वेळी एखाद्ये मोठे वाहनाने जाण्याचा प्रयत्न केल्यास या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच मार्गाने दिवसातुन अनेक वेळा महावितरण कंपनीचे कर्मचारी नेहमीच वावरत असतात त्यांच्या निदर्शनास ही बाब येत नाही हे यावलकरांचे दुदैवच म्हणावे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Protected Content