कृषी जैव तंत्रज्ञान संशोधन व विकास केंद्राचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्याहस्ते उद्घाटन

udhdhav thakarey

जळगाव, प्रतिनिधी । येथील जैन इरिगेशन सिस्टिम्सच्या जैन हिल्स येथील कृषी जैव तंत्रज्ञान संशोधन व विकास केंद्राचे उद्घाटन आज (दि.१५) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
याप्रसंगी माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार, कामगार व राज्य उत्पादन शुलकमंत्री दिलीप वळसे पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेष पाटील, आमदार किशोर पाटील, आ. चिमणराव पाटील, आ. अनिल पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी आदी उपस्थित होते. यावेळी श्री. ठाकरे यांनी उपस्थितांसमवेत विकास केंद्रातील प्रयोगशाळांची पाहणी केली. जैन इरिगेशनचे अनिल जैन आणि अशोक जैन यांनी केंद्राच्या प्रमुख प्रयोगशाळांबद्दल त्यांना माहिती दिली. यावेळी भविष्यात होणारी शेती कशी असेल याबाबत व्हर्टिकल फार्मिंग, टिश्यू कल्चर, हायड्रोपोनिक्स, न्यूट्रिकेयर अँड फिल्टरेशन, ऑटोमेशन, ऍरोपोनिक पोटॅटो, पोटॅटो ब्रीडिंग, सोलर पंप आदी विषयांच्या प्रयोगशाळांना मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी भेट देऊन माहिती घेतली.

Protected Content