तामिळनाडूत ४०० दलितांनी स्वीकारला इस्लाम !

islam

चेन्नई (वृत्तसंस्था) वारंवार होणारा भेदभाव आणि अपमानाला कंटाळून तामिळनाडूतल्या कोईम्बतूर जिल्ह्यात जवळपास ४०० दलितांनी इस्लाम धर्म स्वीकारला आहे.

दलितांनी अचानक एवढ्या मोठ्या संख्येने धर्मांतर करण्याच्या मागे भिंत कोसळल्याचे कारण देण्यात येत आहे, ज्यात १७ जणांचा मृत्यू झाला होता. दलित ग्रामवासीयांच्या समुदायाला कमीपणा दाखवण्यासाठी ती भिंत बांधण्यात आल्याचा आरोप केला होता. इस्लाम स्वीकारणाऱ्या दलितांनी प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे की, आमच्या इच्छेनुसार हे धर्मांतर केले आहे. गेल्या तीन वर्षांपासून इस्लाम धर्माने आम्ही प्रेरित होतो. आता मी इस्लामचे धार्मिक कायदे आणि सिद्धांतांच्या कारणास्तव धर्माचे पालन करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. तमीळ पुलिगल काचीच्या सदस्यांनी सांगितले की, आमच्यासोबत वारंवार भेदभाव, हल्ला आणि अपमान होतो आहे. आम्हाला अस्पृश्य समजले जाते. आम्हाला मंदिरात प्रवेश करणं आणि दुसऱ्यांसोबत दुकानात चहा प्यायची परवानगी नाही.

Protected Content