एफ एम काशेलानी इंग्लिश स्कूलमध्ये कोरोना योद्ध्यांचा सन्मान

 

 

शेगांव : प्रतिनिधी । येथील एफ एम काशेलानी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये नुकताच कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला

या शाळेतील विद्यार्थ्यांचे जे पालक पोलीस, डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आहेत आणि कोरोना काळात सेवा बजावली अशा कोरोना योद्धांचा सत्कार शाळेतर्फे करण्यात आला.

या कार्यक्रमाला मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके, ठाणेदार गोकुळ सूर्यवंशी, ठाणेदार सागर गोडे, डॉ. प्रविण नागरगोजे, डॉ. संध्या नागरगोजे, डॉ. गणेश खटोड आदीची प्रमुख अतिथी होती
यावेळी डॉ. प्रशांत शेळके, गोकुळ सूर्यवंशी, सागर गोडे, डॉ. संध्या नागरगोजे यांनी कोरोना काळात आलेले अनुभव व्यक्त केले. कोरोना योद्धयांनी दाखवलेल्या पराक्रमाच्या चित्रफिती दाखविण्यात आल्या.
शाळेचे अध्यक्ष मनोज काशेलानी , संचालक कुणाल काशेलानी , मुख्याधापक प्रविण ठाकरे यांच्या हस्ते सर्व कोरोना योद्धयांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करणात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्र संचालन शुभम देशमुख यांनी केले.

Protected Content