Home क्रीडा संघर्ष भालेराव याला स्टुडंट ऑलम्पिक कराटे स्पर्धेत सुवर्णपदक  

संघर्ष भालेराव याला स्टुडंट ऑलम्पिक कराटे स्पर्धेत सुवर्णपदक  

0
122

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयाचा विद्यार्थी संघर्ष योगेश भालेराव याने जळगांव जिल्हा स्टुडंन्ट ऑलम्पिक असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 9 व्या जिल्हास्तरीय ऑलम्पिक कराटे स्पर्धेमध्ये आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत सुवर्णपदक पटकावले.

त्याची निवड यातून येत्या 10 तारखेला मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ऑलम्पिक कराटे स्पर्धेसाठी करण्यात आली असून त्याला आरजे मार्शल अकॅडमी चे प्रशिक्षक राजेंद्र जंजाळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.मान्यवरांच्या हस्ते त्याला पदक देऊन सन्मानित करण्यात आले. त्याच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील , योगेश भालेराव तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.


Protected Content

Play sound