विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना प्रकाशाचा मार्ग दाखविला त्या मार्गावरून चालण्याचा आपण प्रयत्न करूया असे आवाहन आ. राजूमामा भोळे यांनी केले. याप्रसंगी महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, भारत मुक्ती मोर्चाचे मुकुंद सपकाळे आदी उपस्थित होते.

तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरतर्फे भाजपा कार्यलय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी, महापौर भारती सोनवणे, महानगर जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशीं, जेष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे, जिल्हा पदाधिकारी राजेंद मराठे, निला चौधरी, राहुल वाघ, सचिन पानपाटील, मनोज भांडारकर, प्रकाश पंडित, महिलां अध्यक्षा दिप्ती चिरमाडे, रेखा वर्मा, राहुल घोरपडे, जयंत चव्हाण, राहुल कोळी आदी उपस्थितीत होते.

 

Protected Content