कृषीमंत्री भुसे यांनी दळवेल येथे केली पिकपाहणी

visit bhuse

पारोळा, प्रतिनिधी । राज्याचे कृषिमंत्री व सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांचे आज (दि. १५) सकाळी ९.३० वाजता मालेगाव निवासातून शासकीय वाहनाने तालुक्यातील दळवेल येथे शासकीय दौऱ्यावर आगमन झाले. त्यावेळेस पारोळा-एरंडोल विधानसभेचे आमदार चिमणराव पाटील उपस्थित होते.

 

सकाळी १०-०० वाजता दळवेल शिवारातील भगवान आत्माराम पाटील यांच्या शेतातील मका पिकाची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या विविध समस्या ठिबक सिंचन बाबत सौर पंप,सोलर पंप बाबत समजून घेतल्या. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाच्या अर्थसहाय्याने श्री अरविंद सखाराम बोरसे राहणार शिरसोदे यांना ट्रॅक्टर, उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण तर्फे श्रीमती कल्‍पनाबाई भटू चौधरी बहादरपूर यांना ट्रॅक्टर, उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान अंतर्गत श्री अरुण मधुकर पाटील राहणार भोलाणे यांना रोटावेटर तर दिनकर मन्साराम पाटील यांना रोटावेटर असे लकी ड्रॉ पद्धतीने काढण्यात आल्यातून देण्यात आले व नानाजी देशमुख आणि संजीवनी प्रकल्पाअंतर्गत घटकांसाठी बंदिस्त शेळीपालन लाभार्थी गणू गवळी यांना १०अधिक१ शेळी अनुदान ३६९३८रुपये तर दुसरा लाभार्थी मनीषा दिलीप गिरासे यांना १०अधीक१ शेळी अनुदान ३६९३८रुपये असे दादा भुसे यांनी लाभार्थ्यांच्या स्वाधीन करण्यात केले.

आज दादा भुसे यांच्या पिक पाहणी दौरा दरम्यान पिक विमा मिळणेबाबत व उर्वरित कापूस बोंड आळी ते ते 33 टक्के अनुदान तसेच ठिबक संच योजना दहा वर्ष वरून पूर्वीप्रमाणे सात वर्षाची करण्यात यावी, याबाबत पारोळा शेतकरी संघटनाकडून निवेदन दिले व चर्चा केली. त्यावेळेस तेथे माजी सरपंच रोहिदास पाटील, चतुर भाऊसाहेब, दगडू पाटील, माजी उपसभापती मधुकर पाटील, सुनील पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी व शेतकरी हे उपस्थित होते.

Protected Content