आ.चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने विविध विकास कामांना सुरूवात

सावदा प्रतिनिधी । सावदा थोरगव्हाण रस्त्यावरील थोरगव्हाण वाघोदा शिव रस्त्याचे खडी करण्याच्या कामास आज सुरुवात करण्यात आली. मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून हा शेत शिवार रस्ता होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने शेत शिवार रस्त्याच्या कामाला सुरुवात सावदा प्रतिनिधी सावदा थोर्गावन रस्त्यावरील थोरगव्हाण वाघोदा शिव रस्त्याचे खडी करण्याच्या कामास आज सुरुवात करण्यात आली मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून हा शेत शिवार रस्ता होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे .याठिकाणी शेतकरी प्रशांत फालक,राजेंद्र माळी, अशोक नेमाडे, शिवसेना शहर प्रमुख भरत नेहते,सुरज परदेशी,माजी नगरसेवक शाम पाटील,गौरव भेरवा,गणेश माळीउपस्थित होते.

मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शहरा सह परिसरात विकास कामाचा धडाकाच सुरू केला असून खंडेराव वाडी देवस्थान  सामाजिक हॉल करिता ५५ लाख,शहराला पाणी पुरवठा होत असलेली नागरपालिके जवळील जीर्ण झालेली पाण्या टाकी नवीन बांधकाम साठी ७५ लाख रुपये,ख्वाजा नगर येथे शादी खाना हॉल करिता ६० लाख रुपये,सोमेश्वर नगर परिसरात रस्ता दुरुस्ती करिता ३५ लाख रुपये या कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे .

 

Protected Content