यावल येथे शिवसेनेतर्फे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंचा निषेध

यावल, प्रतिनिधी ।राज्यसभेच्य़ा नवनिर्वाचीत खासदारांचा शपथविधी सोहळ्याप्रसंगी भाजपा नेते उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणा दिली. त्यावरून राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला होता. यातून संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान असल्याचा आरोप शिवसनेच्यावतीने करण्यात येवुन या घटनेचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. या आशयाचे निवेदन शिवसेनेतर्फे तहसीलदार जितेंद्र कुवर यांना देण्यात आले.

शिवसेनेतर्फे तहसीलदार यांना निवेदन देऊन राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेतर्फे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रविंद्र सोनवणे ,शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, गोपाळ चौधरी, आणि शरद कोळी भाऊसाहेब धनगर,, संतोष धोबी, पप्पू जोशी , सेनेचे माजी तालुकाप्रमुख कडू पाटील , योगेश चौधरी, योगेश राजपूत , विजय पंडित , पिंटू कुंभार , सागर बोरसे , प्रवीण बडगुजर, , निलेश पाराशर ,मोहसीन खान, जितेन्द्र फालक, गोकुळ कोळी यांनी यावेळी हे निवेदन दिले

Protected Content