Home Cities जळगाव ना. गिरीश महाजन जळगावचे नवे पालकमंत्री !

ना. गिरीश महाजन जळगावचे नवे पालकमंत्री !

0
39


मुंबई प्रतिनिधी । जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याकडे जळगाव जिल्हा पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली असून निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.

जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याकडे राज्य मंत्रीमंडळातील महत्वाचे खाते असून ते मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले मानले जातात. मात्र त्यांच्याकडे जळगावऐवजी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले होते. एकनाथराव खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर पालकमंत्रीपद हे चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र त्यांना जिल्ह्याकडे पुरेसे लक्ष न दिल्याची ओरड होत होती. या पार्श्‍वभूमिवर, आज जळगावच्या पालकमंत्रीपदी ना. गिरीशभाऊ महाजन यांची नियुक्ती करण्यात आली असून चंद्रकांत पाटील यांना पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound