देशात संविधान आहे तर कुटुंबात संविधान का नाही ? – आचार्य विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ७ मार्च गुरुवार रोजी आपल्या प्रवचनात ” काही धूप, काही छॉंव ” या विषयावर सुख आणि दुःख याचे स्वरूप स्पष्ट करतांना ते म्हणाले की दुःख आपल्या जीवनात बळ देते समोरचे दुःख स्वीकारा. नकारात दुःख आहे, स्वीकारात आनंद आहे.प्रगत ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आम्हाला वेदना व श्रमा पासुन दुर ठेवते. जेव्हा नैसर्गिक श्रम दूर होतात तेव्हा आपल्याला कृत्रिम श्रमाचा अवलंब करावा लागतो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जायचे असेल तर त्याचे ४ पर्याय आहेत.

१) नुकसान टाळण्यासाठी तरतूद :- आपल्या चुकांची पुनरावृत्ती टाळा, एकदा चूक करणे हे ऊन असू शकते परंतु त्या चुकातून सावरणे सावली असू शकते चूक माफ होते, चुकीची पुनरावृत्ती माफ होत नाही.

२) लक्ष बदलु टाका :- ज्या पैशाच्या मागे सारे जग धावत आहेत त्या पैशाच्या मागे मला धावायचे नाही आणि ज्या सत्याच्या मार्गावर पाऊल ठेवताना सर्वांना भीती वाटते त्या मार्गावर मला धावायचे आहे , देशात संविधान आहे तर कुटुंबात निश्चित संविधान का नाही ?

३) अडथळे दूर केले जाऊ शकतात :- दृष्टिकोन बदलवून अडचणी सोडवता येतात , चुकीचा दृष्टिकोन म्हणजेच दुःख, एक दिवसासाठी तुम्ही ठरवा की आज मी कसल्याही प्रकारची कोणतीही तक्रार करणार नाही.आणी शेवटचा पर्याय आहे

४) नुकसानीची भरपाई करा :- चुकीच्या वर्तनामुळे होणारे नुकसान चांगल्या वर्तनाने भरून काढता येते. जर चांगले काम करायचे असेल तर कोणतीही वेळ वाईट नाही आणि वाईट करायचे असेल तर कोणतीही वेळ चांगली नाही.

Protected Content