एरंडोल येथे ज्येष्ठ नागरीकांसाठी कायदेविषयक शिबीर संपन्न

एरंडोल, प्रतिनिधी | भारतीय स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सवानिमित्ताने एरंडोल विधीसेवा समिती आणि एरंडोल वकील संघाच्या विद्यमाने ज्येष्ठ नागरीकांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठांसाठी महत्वपूर्ण कायद्यांबाबत वकील संघ सदस्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

 

एरंडोल सुर्योद्यय ज्येष्ठ नागरीक संघाच्या सभागृहात संपन्न झालेल्या शिबीरासाठी अध्यक्षस्थानी एरंडोल न्यायालयाचे न्या. विशाल एस. धोंडगे होते तर व्यासपीठावर ज्येष्ठ अ‍ॅड. आल्हाद काळे, अ‍ॅड. पी. एस. बिर्ला, माजी आमदार महेंद्रसिंंह बापू पाटील, अ‍ॅड. विलास मोरे, अ‍ॅड. जगन्नाथ पाटील, अ‍ॅड. ज्ञानेश्वर महाजन, ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष तथा निवृत्त तहसिलदार अरूण माळी होते.
कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने आणि विधीगीताने करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरीकांसाठी कायद्याचे संरक्षण, विविध योजना, सहकार्य, मोफत मार्गदर्शनबाबत अ‍ॅड. विलास मोरे, अ‍ॅड. ज्ञानेश्वर महाजन यांनी मार्गदर्शन केले तर अ‍ॅड. जगन्नाथ पाटील यांनी पालकांनी देखील जबाबदारीने वागून मुलांवर चांगले संस्कार करण्याची गरज उदाहरणासह सांगितले. न्या. धोंडगे यांनी ज्येष्ठ नागरीकांनी कायदेविषयक मोफत मार्गदर्शनासाठी वकील संघ विधी समिती सहकार्य करणार असल्याचे सांगून लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कवी प्रवीण महाजन यांनी तर आभार प्रदर्शन संस्थाध्यक्ष अरूण माळी यांनी केले. यशस्वीतेसाठी सचिव विनायक कुळकर्णींसह जाधवराव जगताप, विश्वनाथ पाटील, सुपडू भांडारकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी निवृत्त प्राचार्य एस. पी. बापू पाटील, आरती ठाकूर, प्रा. शिवाजीराव अहिरराव, अ‍ॅड. दिनकर पाटील, अ‍ॅड. प्रेमराज पाटील, अ‍ॅड. अजिंक्य काळे, अ‍ॅड. निरज जगताप, शिंदे सर, अ‍ॅड. सुरेश देशमुख, वसंतराव पाटील, नामदेव पाटील, भगवान महाजन, विश्वनाथ महाजन, कोठावदे गुरूजी, गुलाबराव पवार, जयराम पाटील, गोविंद लढे, शर्मा सर, जैन, भागवत पाटील, शिवाजी महाजन, भास्कर बडगुजर, निंबा कुंभार, सुभाष दर्शे, बाबुलाल लोहार, शालिनी परदेशी, रूख्मिणी बिर्ला, मंगला कुलकर्णी, संगीता बडगुजर, भिमराव पाटील, जगन महाजन, पी. जी. चौधरी, कवी निंबा बडगुजर आदींसह ज्येष्ठ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content