पिंप्री येथील ग्रामसेवक यांची तात्काळ बदली करण्याची मागणी

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील पिंप्री ग्रामपंचायतचे कार्यरत असलेले ग्रामसेवक यांची तात्काळ बदली करा, याबाबत सरपंच व उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून ग्रामसेवकाची त्वरित बदली करण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात पिंप्री तालुका यावल येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक प्रविण बळीराम कोळी हे गावातील सरपंच व उपसरपंच आणी ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात न घेता तसेच गावातील ग्रामस्थांसाठी हितासाठी व गावाच्या विकासासाठी येणाऱ्या विविध शासकीय योजनांची उदारणार्थ महीला बालकल्याण, आदीवासी विकास योजना, अपंग कल्याण योजना , रोजगार हमी योजना या कल्याणकारी योजनांची माहिती कुणालाही देत नाही.

ग्रामसेवक प्रविण कोळी हे स्वतः मनमानी कारभार करीत त्यांच्या सोयीनुसार ते गावात येत असल्याचे तक्रारीत म्हटले असुन, ग्रामसेवकांच्या अशा वागणुकीमुळे ग्रामस्थांना अनेक अडचणी व गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर सरपंच व उपसरपंच यांच्याशी एकेरी भाषेत बोलणे करून दमदाटी करतात, गावातील कर वसुलीचा बॅंकेत भरणा न करता सरपंच व उपसरपंच आदींना न कळविता निधी गाहाळ करतात.

अशा प्रकारे बोगस आणी बेजबाबदार आपल्या कर्तव्याची जाणीव नसलेल्या ग्रामसेवकाची तात्काळ पिंप्री हुन बदली करून त्यांनी केलेल्या कारभाराची चौकशी करून पुढील कार्यवाही करावी अशी मागणी लिखित तक्रार यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड ( बोरसे ) यांच्याकडे पिंप्री गावाचे सरपंच मोहन सपकाळे , उपसरपंच आशा सपकाळे, ग्राम पंचायत सदस्य दिपाली सपकाळे, रोहीदास  कोळी, श्रावण सपकाळे यांच्यासह भिका भोई, कैलास सोनवणे, प्रदीप सपकाळे, दिनकर सपकाळे, अजय भोई, सुनिल सपकाळे, पिंताबर सपकाळे, चुडामण सपकाळे यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या या तक्रार निवेदनावर स्वाक्षरी आहेत.

 

Protected Content