जळगावात तंत्रनिकेतनाच्या विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्रियल विझिटचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । के.सी.ई.एस. अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स -दूरसंचार  इंजिनीरिंग विभागातर्फे आर.जे. फूड प्रॉडक्ट, जय किसान ऍग्रो, द्वारका ट्रान्स इंडस्ट्रीज जळगाव  येथे तंत्रनिकेतनाच्या द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्रियल विझिटचे आयोजन करण्यात आले.

यात  योगेश पाटील, भास्कर बोरोले, रवींद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबंधित विषयाचे  ज्ञान दिले, तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. सदरील इंडस्ट्रियल विझिट प्रा.जगदीश पाटील यांनी आयोजित केली. ही भेट विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसाठी खूप फायदेशीर ठरली.

 

Protected Content