वीज पुरवठा खंडित केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन – भाजपतर्फे इशारा

चाळीसगाव प्रतिनिधी । वीजपुरवठा रोखण्याच्या निषेधार्थ भाजपने आज तहसीलदार अमोल मोरे आणि कार्यकारी अभियंता यांना निवेदन पाठविले. हे त्वरित थांबवावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही भाजपने दिला आहे.

शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांचे शेतीचे वीज कनेक्शन तोडण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर चाळीसगाव भारतीय जनता पक्षातर्फे तहसिलदार अमोल मोरे व कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्यास भाजपातर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के बी दादा साळुंखे, जिल्हा चिटणीस ऍड. प्रशांत पालवे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, सरचिटणीस गिरीष बराटे, शहर सरचिटणीस जितेंद्र वाघ, नगरसेवक नितीन पाटील, चिरगोद्दीन शेख, भूषण पाटील, गोरखभाऊ चव्हाण, दिनकर राठोड, दीपक राजपूत, किशोर रणधीर, निवृत्ती कवडे, तुषार देसले, यश पालवे, मधुकर गोपाळ, प्रशांत मराठे, सागर मुंडे, राकेश पाटील, गणेश पाटील, विकास पाटील आदी उपस्थित होते.

विजबिलावरील इतर आकार व व्याज माफ करून थकलेले वीज बिल भरण्यासाठी सवलत देऊ असे प्रतिपादन वीजमंत्र्यांनी दिले होते. तरीही कोणतीही बाब लक्षात न घेता निम्मे वीजबिल भरण्यासाठी शेतकऱ्याकडे तगादा लावला जातोय. कोणतीही पूर्व सूचना न देता संपूर्ण डीपी बंद करून नाहक शेतकऱ्याला त्रास दिला जातोय. शेतकऱ्यांना जाणून बुजून त्रास देणे थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजपातर्फे देण्यात आले आहे.

Protected Content