एरंडोलात नायब तहसीलदारांसह दोन लिपीक कोरोना बाधीत

एरंडोल प्रतिनिधी । कोरोनाचा प्रकोप पुन्हा वाढीस लागला असून आज नायब तहसीलदारांसह दोन लिपीक कोरोना बाधीत झाल्याचे आढळून आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना तडीपार झाला असे चित्र निर्माण झाले होते. मात्र एरंडोल येथील प्रांत कार्यालयात एक नायब तहसीलदार व दोन लिपिक नुकतेच कोरोना बाधित आढळून आल्यामुळे कोरोना ने पुन्हा डोके वर काढलेचे स्पष्ट झाले आहे. 

प्रांत अधिकारी विनय गोसावी यांनी कोरॊना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एरंडोल धरणगाव व पारोळा तालुक्यात कोरोणा रोखण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. म्हणून कोरोना तालुक्यात रोखणे शक्य झाले होते. दरम्यान गेल्या  आठ दिवसात ज्या नागरिकांनी एरंडोल येथे प्रांत कार्यालयात भेट दिली व वीस मिनिटे कार्यालयात थांबले त्या नागरिकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन प्रांत अधिकारी विनय गोसावी यांनी एका प्रेस नोट द्वारे केले आहे तसेच नागरिकांनी प्रांत कार्यालयात मास्क  लावूनच यावे व काळजी घ्यावी असे कळविण्यात आले आहे.

 

 

Protected Content