कर्की फाट्याजवळ साडे चार लाखांचा गुटखा जप्त

मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील कर्की फाट्याजवळ एका ओमनी वाहनातून पोलिसांनी तब्बल साडे चार लाख रूपयांचा गुटखा जप्त केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की फाटा येथे मध्यप्रदेशातून येणाऱ्या MH15CT6517 या ओमनी गाडीवर छापा टाकला.

या गाडीमध्ये प्रतिबंधित केलेला विमल गुटखा त्याची किंमत 450000 चार लाख पन्नास हजार चार चाकी ओम्नी गाडी किंमत 100000एक लाख असा साडे पाच लाखाचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला आहे. कारवाईवेळी राजेंद्र गोसावी व पुरुषोत्तम पोलाखेरे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

 व त्यांच्यावर  आयपीसी  कलम 328 188 272 273 प्रमाणे फिर्यादी दीपक शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्यांच्या पथकात अशरफ खान, सागर सावे, नितीन चौधरी, उमेश महाजन हे सहभागी होते. तसेच पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश सोळुंके  करीत आहे.

Protected Content