अमोल मिटकरींवर कारवाई करा : ब्राह्मण समाजाची मागणी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील ब्राह्मण समाज संघर्ष समितीने केली आहे.

इस्लामपूर येथील सभेत आमदार अमोल मिटकरी यांनी केेलेले वक्तव्य वादाच्या भोवर्‍यात आढळले असून या प्रकरणी ब्राह्मण समाजाने आक्रमक भूमीका घेतली आहे. या अनुषंगाने अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी समस्त ब्राह्मण समाजाने केली. याबाबत प्रांताधिकारी व पोलिसांना निवेदन देण्यात आले.

या संदर्भातील निवेदनात म्हटले की, इस्लामपूरच्या सभेत आमदार मिटकरींनी हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या. त्यामुळे त्यांनी समाजाची माफी मागावी. मिटकरी हे आमदार असून त्यांनी हिंदू समाजात पौरोहित्य करणार्‍यांबाबत व विवाह परंपरेबाबत चुकीचे विधान करून ब्राह्मण समाजाची खिल्ली उडवली. त्यांनी यापूर्वी देखील हिंदू व ब्राह्मण धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. विविध जाती व धर्माच्या बाबतीत चूकीचे व पुरावाशुन्य विधाने करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भावना दुखवल्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, मिटकरी व राष्ट्रवादी कॉंग्रेसने हिंदू समाजाची माफी मागावी अशी मागणी केली आहे. याबाबत प्रांताधिकारी तसेच पोलिस प्रशासनाला निवेदन दिले आहे. यावेळी उमाकांत शर्मा, दीपक पाथरकर, जयप्रकाश शुक्ला, योगेश तिवारी, शंतनू गचके, देवेश कुलकर्णी, वैजनाथ कुळकर्णी, सागर पत्की, दीपक कुलकर्णी, लोकेश जोशी, ऍड.अभिजीत मेणे, भूषण जोशी उपस्थित होते.

Protected Content