अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत निवेदन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | अतिवृष्टीमुळे शहरातील ४० ते ५० समाज बांधवांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तुंचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त समाज बांधवांना नुकसान भरपाई मिळावी. या मागणीसाठी आज दि. १३ जुलै रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा मंत्री बबनराव घोलप, राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे व जिल्हाध्यक्ष पांडुरंग बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल व तहसिलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले.

दि. ८ जुलै २०२२ रोजी पाचोरा शहरासह परिसरात रात्रीच्या वेळी सुमारे तीन तास झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी हनुमान नगर भागातील ४० ते ५० समाज बांधवांच्या घरात शिरल्याने त्यांच्या घरातील संसारोपयोगी वस्तुंचे अतोनात नुकसान झाले असून हात मजुरी करुन आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवत असणाऱ्या समाज बांधवांच्या घराचे तात्काळ पंचनामे करुन शासनातर्फे नुकसान भरपाई मिळावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल व तहसिलदार कैलास चावडे यांना देण्यात आले.

निवेदन देते प्रसंगी पाचोरा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष गोवर्धन जाधव, तालुका युवा अध्यक्ष रमेश पवार, आर. पी. आय. चे तालुका अध्यक्ष विनोद अहिरे, सरचिटणीस प्रकाश भिवसने सह नुकसानग्रस्त समाज बांधव शिवलाल जाधव, सिताराम पवार, गंगुबाई पवार, हरी कोळी, हिरालाल जाधव, राजु पवार, गोरख कोळी, कमरुणिसा पटेल उपस्थित होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी निवेदन कर्त्यांना सांगितले की, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना अगोदरच सुचना दिल्या असुन युद्ध पातळीवर पंचनामे करण्याचे काम देखील आधीच सुरू झाले आहे. लवकरच याबाबत अहवाल तयार करुन वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात येईल असे आश्वासन डॉ. विक्रम बांदल यांनी निवेदन कर्त्यांना दिले.

Protected Content