गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा आगळा वेगळा गणपती

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।   गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात नर्सिंगचे शिक्षण घेऊन रुग्णांची सेवा-सुश्रृषा करणार्‍यांनी विद्यार्थ्यांनी यंदाच्यावर्षी ग्रामीण संस्कृतीचे वर्णन दाखविणारा हुबेहुब असा आकर्षक देखावा साकारला असून तरुणाईंचे आयडॉल असणार्‍या गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकीताई पाटील व सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ञ डॉ.वैभव पाटील यांच्या शुभहस्ते महाआरती करण्यात आली.

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात आज गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली असून पाच दिवसांचा गणेशोत्सव येथे साजरा करण्यात येणार आहे. त्या गणेशोत्सवास आज प्रारंभ झाला असून प्रवेशद्वारापासून आपण मंदिरातच जात आहोत अशी सुंदर सजावट विद्यार्थ्यांनी केली आहे. ग्रामीण भागातील संस्कृतीची अभ्यास करत एक एक सर्वच गोष्टी देखाव्यातून दाखविण्यात आल्या आहेत. याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा.स्वाती गाडेगोने व श्री पंकज (पती) यांच्याहस्ते गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली. श्री गणेशाच्या स्थापनेनंतर डॉ.पाटील दाम्पत्यांच्याहस्ते महाआरती करण्यात आली, यावेळी गणपती बाप्पा मोरयाचा गजर करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य विशाखा गणवीर, शिवानंद बिरादार, प्रशासकीय अधिकारी प्रवीण कोल्हे, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ उपस्थीत होते. या उपक्रमासाठी प्राचार्यांपासून ते प्राध्यापक, विद्यार्थी वर्गाने मेहनत घेऊन उत्कृष्ठ गणेशोत्सवाचे नियोजन केले आहे.

Protected Content