Home Cities जळगाव नाना महाराज तराणेकर त्रिपदी परिवारतर्फे गरजूंना मोफत अन्नधान्य वाटप (व्हिडीओ)

नाना महाराज तराणेकर त्रिपदी परिवारतर्फे गरजूंना मोफत अन्नधान्य वाटप (व्हिडीओ)

0
259


जळगाव प्रतिनिधी । नाना महाराज तराणेकर त्रिपदी परिवार इंदौर यांच्या अंतर्गत त्रिपदी परिवार जळगाव शाखेच्या वतीने आज बुधवारी दुपारी १ वाजता जळगाव पाचोरा रोडवरील श्रीकृष्ण लॉन समोरील गरीब गरजूंना मोफत अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे.

कोरोना काळात अनेकांचे रोजगार बंद पडले आहे. यात गरीब मजूर होरपळला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोना संचारबंदी असल्याने हाताला काम देखील नाही. अशा गंभीर परिस्थितीत आपण समाजाचे काही देणे लागतो या उदात्त भावनेने जळगाव पाचोरा रोडवरील श्रीकृष्ण लॉन समोरील मोकळ जागेत झोपडी करून राहणाऱ्या गरीब गरजूं ३० कुटुंबाला मोफत किराणा देण्यात आला. याप्रसंगी नंदू चौधरी, किशोर वाघ, तारे बापू, निलेश चौधरी, महेश सोनार आदींची उपस्थित आहेत. यावेळी ३० कुटुंबांना मोफत किरणा साहित्य देण्यात आले.


Protected Content

Play sound