कोरपावली परिसरात कापुस खरेदीत शेतकऱ्यांची लूट

 

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली व परीसरात कापसीचे पिक पेरणीसाठीचे क्षेत्र हे मोठया प्रमाणात उपलब्ध आहे. यावर्षी मात्र, परतीच्या पावसाने अपेक्षित बोंडे लागलेली नाही या पावसाने पाने पिवळी व लालसर पडली त्यामुळे उत्पन्न कमी झाले असून हवा तसा भाव न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

यावर्षी कापसाला पाच वर्षांनी निच्चांकी दर गाठून शासनाचा हमी भाव पाच हजारांच्यावर असून ही व्यापाऱ्यांकडून कापसाची कवडीमोल भावाने खरेदी ग्रामीण भागातुन केली जात आहे. मागील वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा शेतकऱ्यांच्या हाती पैसा नसल्याने रब्बीची पिके उभी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने मिळेल त्या भावात शेतकरी बांधव आपल्याकडील कापसाची विक्री करतांना दिसत आहेत. यात हमी भावा पेक्षा अतिशय कमी दर शेतकऱ्यांना मिळत आहे, कापूस खरेदी केन्द्र हे शेतकऱ्याकडून महिन्याच्या अटीशर्तीवर पैसा देवु असे सांगुन कापूस खरेदी करीत आहेत. ते शेतकऱ्यांच्या हिताचे नसुन , त्याचा फायदा व्यापारी उठवितांना दिसत आहेत. कापसाच्या खरेदी केंद्राच्या गोंधळल्या नियमामुळे व्यापारी शेतकऱ्यांचे पांढऱ्या सोन्याची लूट करीत आहे. शेतकऱ्यांकडील राखुन ठेवलेल्या कापसाची खरेदीच्या आकड्यामध्ये वाढ होत असल्याचे दिसून येताच व्यापाऱ्यांनी अगदीं ४००० ते ४३००या भावाने कापूस खरेदीला सुरुवात केली असुन ७०० ते ९०० रुपयांनी घसरल्याने आधीच परतीच्या झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यानें उत्पन्न घटले आहे. येणाऱ्या काळात कापसाचे भाव अजून गडगडतील की काय अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. तरी शासनाने अशा प्रकारे अवैधरित्या तथाकथीत व्यापारी मंडळी होणारी शेतकऱ्यांची कापुस खरेदी थांबवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी ग्रामीण भागातील शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे .

Protected Content