कोरपावली ग्रामपंचायतीला गटविकास अधिकाऱ्यांची अचानक भेट

 

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपवली ग्राम पंचायतीच्या कार्यालयाला दिनांक २० ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजे च्या सुमारास यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील व त्यांचे सहकारी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी किशोर सपकाळे यांनी अचानक भेट दिल्याने त्यांना ग्रामपंपचायत कार्यालय व परिसरात सर्वत्र अस्वछता व घाण पसरले असल्याचे चित्र नजरेस पडले. याबाबत त्यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली.

अचानक आलेल्या गटविकास अधिकारी यांच्या भेटीने ग्रामपंचायतीमध्ये चांगलीच खळबळ उडाली यावेळी . गटविकास अधिकारी पाटील यांनी पाणीपुरवठा कर्मचारी समीर रमजान तडवी यांना पाणीपुरवठ्याच्या संदर्भात काही प्रमाणात विचारपूस करून रेकॉर्ड पाहणीसाठी ताब्यात घेतले. त्यात काही रजिस्टर हे अपूर्ण भरल्याचे आढळून आले. चौकशी दरम्यान ग्रामपंचायत सद्स्य सर्फराज अहमद तडवी व पाणीपुरवठा कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषदच्या शाळेत १४ व्या वित्तीय आयोगाची कामे पुर्णपणे झाली नसून संपूर्ण ग्रामपंचयतीच्या क्षेत्रात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र पाहून गट विकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या कारभार बद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली. याप्रसंगी माजी सरपंच, ग्रामसेवक अन्य ग्रामपंचायत सदस्य उपस्थित नसल्याने गटविकास अधिकारी हे ग्रामपंचायतच्या उदासीन कारभारामुळे काय व कशा प्रकारची आपली पुढील कारवाई करतात याकडे कोरपावली ग्रामस्थांचे पारिसरातील नागरीकांचे लक्ष केंद्रित झाले आहे. दरम्यान, मागील दोन वर्षापासुन कोरपावली ग्रामपंचायत ही आर्थिक गोंधळलेल्या कारभाराने चांगलीच चर्चेस आली असुन यात विशेष म्हणजे पंचायतीवर शासनाने प्रशासकाची नेमणुक केल्यावर गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत कारभाराच्या चौकशीस वेळ कशा मिळाला असा प्रश्न देखील चर्चेला जात आहे .

Protected Content