यावल कृषी उत्पन्न बाजार समितीला मुदत वाढ

 

यावल, प्रतिनिधी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्य शासनाकडुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुनश्च सहा महीन्यांची मुदत वाढ मिळाली आहे. 

जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नाने व चोपडा व यावल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार लता सोनवणे यांच्या पाठपुराव्याने यावल कृषी उत्पन्न बाजार समितीला पुनश्च सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यकारी संचालक मंडळाची मुदतही ८ सप्टेंबर २०२० रोजी संपुष्टात आली आहे.  कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम१९६४ कलम१४ ( ३ ) अनुसार शासन नियमा अधिकाराचा वापर करीत १७  सप्टेंबर २०२० रोजीच्या आदेशान्वये ८ मार्च २०२०पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सभापती तुषार उर्फ मुन्ना सांडुसिंग पाटील कृषि उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक मंड़ळ यांनी ना. गुलाबराव पाटील व प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार लता सोनवणे यांचे आभार व्यक्त केलेले आहे.  महाराष्ट्र राज्यात पुनश्च उदभवलेल्या कोरोना विषाणुच्या गंभीर परिस्थितीचा विचार करता संसर्ग विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यात प्रबळ अमलबजावणी सुरू आहे. निवडणुका नियत झालेल्या राज्यातील बाजार क्षेत्रात काम करणाऱ्या कृषी पतसंस्था  व बहुउद्देशीय सहकारी संस्था यांच्या निवडणुका पुनश्च ९ मार्च २०२१पासुन ते ८  सप्टेंबर २०२१पर्यंतची मुदतवाढ देण्यात आल्याचे शासन आदेश जयंत भोईर कार्यसन अधिकारी, महाराष्ट्र शासन यांचे पत्र प्राप्त झाले आहे.

 

Protected Content