हिंदु जनजागृती समितीचे विविध मागण्यासंदर्भात नायब तहसीलदारांना निवेदन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पश्चिम बंगाल येथे तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत सातत्याने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले जात आहेत.गेली अनेक वर्षे बंगाल मधील संदेशखली येथे हिंदु महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख यांना नुकतीच अटक करण्यात आली आहे. याची दखल राज्य पोलीसांनी ही घेतलेली नाही. तेथे सामान्य हिंदु नागरिकांच्या संवैधानिक अधिकारांचे रक्षण होईल अशी स्थिती नाही, त्यामुळे तेथे तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी,अशी मागणी यावल येथील निवासी नायब तहसिलदार संतोष विनंते यांना निवेदन देताना सागर लोहार, कमलेश शिर्के, सुधाकर धनगर, राहुल कोळी, चेतन भोईटे, स्वप्निल कराडे, जयेश फालक, सागर कोळी, सागर धनगर, यश कोळी, केशवानंद काटकर हे उपस्थित होते.

सोनई, तालुका नेवासा जिल्हा नगर येथील विनियार्ड ब्लेसेड चर्चच्या पास्टर सुनील गंगावणे, पास्टर उत्तम वैरागर, पास्टर संजय वैरागर यांनी अल्पवयीन दोन मुलींना तिच्या आजीला झालेला आजार बरे करण्याचे औषध देतो असे सांगत त्यांना चर्च मध्ये बोलावून सतत लैंगिक अत्याचार केला. गावातील काही सजग युवकांनी याचे चित्रीकरण केल्याने हे दुष्कृत्य बाहेर आले. त्यामुळे या तीनही पास्टरवर कठोरात कठोर कारवाई करून यांच्या चर्चमध्ये अशी दुष्कृत्ये चालतात का ? याची चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली गेली. नुकतेच मनमाड येथे पूज्य भिडे गुरुजी यांचे वाहन अडवून त्यावर काही समाजकंटकानी आक्रमण केले. त्यांवर कारवाई करण्यात यावी,तसेच त्यामागे कोणाचा कुटील हात आहे हे शोधून काढून त्यांनाही कारावासात डांबावे अन् पूज्य गुरुजींना सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

Protected Content