नेहरू चौक मित्र मंडळातर्फे शिबिरात २५ जणांचे रक्तदान

 

जळगाव, प्रतिनिधी । येथील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जळगावचा राजा नेहरू चौक मित्र मंडळातर्फ नुकत्याच घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात २५ जणांनी रक्तदान केले. तसेच, किशोर पाटील या युवकाने प्लाझ्मा दान केले.

गेल्या ३४ वर्षापासून नेहरू चौक मित्र मंडळ वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवीत आहे. यंदा देखील करोना संक्रमणाच्या काळात शासकीय नियम पाळून श्री गणेशाची स्थापना मंडळाने केली आहे. सर्वप्रथम गरजू मुलांना वह्या वाटप करण्यात आल्या. त्याचा २० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. त्यानंतर येणाऱ्या भाविकांना आणि परिसरातील नागरिकांना करोनाच्या काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक आयुष काढा वाटप करण्यात आला.

शहरात रक्तदानाचा तुटवडा लक्षात घेता मंडळातर्फे गुरुवारी संध्याकाळी रक्तदान शिबीर मनपाच्या इमारतीखाली घेण्यात आले. या शिबिरात इंडियन रेड्क्रोस सोसायटीच्या सहकार्याने करण शहा, रिकेश गांधी, श्रीकांत चौधरी, आकाश कांबळे यांच्यासह २५ भाविकांनी रक्तदान केले. तसेच रक्तदानाविषयी विविध माहिती रेड्क्रोसच्या पदाधिकार्यांनी दिली.

यावेळी डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, सचिव विनोद बियाणी, नेहरू चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी, रिकेश गांधी, पियुष गांधी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. रेड्क्रोस सोसायटीचे डॉ.ए.डी.चौधरी, उमाकांत शिंपी, संदीप वाणी हे उपस्थित होते. तसेच, करोना रुग्णांना मदत व्हावी म्हणून प्लाझमा दान करण्याचे देखील आवाहन करण्यात आले. त्यात किशोर पाटील या भाविकाने प्लाझ्मा दान केले.

Protected Content