Home क्राईम बालसुधार गृहात गळफास घेतलेल्या बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू

बालसुधार गृहात गळफास घेतलेल्या बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू

0
160


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील बालसुधार गृहातील शौचालयात १४ वर्षीय बालिकेने १२ ऑगस्ट रोजी गळफास घेतला होता. तिच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचारास सुरू असतांना मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  पूनम सुरेश भिल (१४, रा. अमळनेर) असे मयत बालिकेचे नाव आहे.

 

अमळनेर येथील पूनम भिल ही मुलगी जळगाव येथील बालसुधार गृह जिल्हा परिविक्षा निरीक्षण गृहात होती. पूनम हिला घरी जायचे होते. परंतू तिचे वडील बाहेरगावी असल्याने तिला नेणे शक्य झाले नाही. घरी जाण्याच्या मागणीच्या दुसऱ्याच दिवशी तिने गळफास घेतला. तिच्यावर ११ दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अखेर मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी तिची प्राणज्योत मालविली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound