मी अयोध्या जाणार पण २२ नंतर – शरद पवार

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जगात साखर आणि इथेनॉलची गरज लक्षात घेऊन साखर आणि इथेनॉल निर्मितीकडे लक्ष दिले जाते. माजी केंद्रीय कृषीमंत्री म्हणून केंद्र सरकारमध्ये यापूर्वी केले. केंद्रात गृहखाते नाकारुन कृषी खाते मागून घेतले. त्याकाळात शेतीसाठी खुप काही करता आले, असे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, अयोध्येतील श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, मला त्याचे आमंत्रण आलेले नाही. मी म्हटले काही हरकत नाही, पण मी जाणार. मात्र 22 जानेवारीला नाही जाणार, नंतर नक्की जाईन. श्रीराम हे सर्वांचे आहेत. अयोध्येला जाणाऱ्या विमानाच्या तिकिटात वाढ केलेली आहे. दहा हजारांचे तिकीट चाळीस हजार करण्यात आलेत. विमानसेवा अशी महागली आहे, अशावेळी कोणी अयोध्येला गेला नाही तर त्या व्यक्तीला श्रीरामांबद्दल आस्था नाही, असा अर्थ काढणे चुकीचे राहील.

शरद पवार म्हणाले की, कांदा निर्यातबंदी धोरणात सातत्य पाहिजे. निर्यातबंदी कशासाठी केली. कांदा महाग झाला म्हणुन निर्यातबंदी घाला म्हणुन त्यावेळी मागणी केली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभाव मिळावा हिच भावना आहे. साखर उत्पादन जास्त असतानाही साखरेची निर्यात करायची नाही हे धोरण योग्य नाही. साखर, कांदा निर्यात धोरणात सातत्य हवे.

शरद पवार यांनी घराणेशाहीच्या टीकेवरुन पंतप्रधान मोदींवर पलटवार केला. पंतप्रधान काल येऊन गेले. त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले घराणेशाही आली आहे, ती मोडीत काढायला हवी. आता घराणेशाही म्हणजे नेमके काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर तसेच डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, व्यापाऱ्यांचा मुलगा व्यापारी आणि शेतकऱ्यांचा मुलगा शेतकरी होतो. मग राजकारण्यांचा मुलगा राजकारणात आला तर ही कशी काय घराणेशाही झाली? त्यामुळे पंतप्रधानांनी घराणेशाही बाबत बोलणे योग्य नाही. त्यांनी मूलभूत प्रश्नांवर बोलायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे.

Protected Content