दिव्यांग व सामाजिक व बहुउद्देशीय संस्थातर्फे दिव्यांग बांधवांना ब्लॅंकेट व साहित्य वाटप

फैजपुर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पिंपरूड येथील दिव्यांग व सामाजिक व बहुउद्देशीय संस्था (राहुल कोल्हे सामाजिक मित्र मंडळ) तर्फे राष्ट्रीय युवा दिन, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद व आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त तथा पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार बांधवांचा सन्मान तथा दिव्यांग बांधवांना ब्लॅंकेट व साहित्य वाटप, दिव्यांग बांधवांच्या मुलांना स्कूल बॅग, रेशन कार्डचे वाटप करण्यात आले. फैजपूर शहरातील पत्रकारांना सन्मानचिन्ह, शाल, पुस्तक, पेन, डायरी देऊन सन्मानित करण्यात आले. येथील राहुल कोल्हे सामाजिक मित्र मंडळ हे दरवर्षी पत्रकार दिनाच्या निमित्ताने दिव्यांग बांधवांना मदत तसेच पत्रकारांचा सन्मान करित असतात.

सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत एक निस्वार्थ काम करणारी संस्था म्हणजेच दिव्यांग व सामाजिक बहुउद्देशीय (राहुल कोल्हे सामाजिक मित्र मंडळ) हे स्वतः दिव्यांग मित्र परिवार असून सुद्धा समाजातील प्रत्येक कार्यात अग्रेसर असल्याचे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून से.नि. सहा. पोलीस उपआयुक्त दिलीप सूर्यवंशी, साहित्य भूषण लेखक धनंजय कोल्हे जळगाव, सहा. पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या हस्ते पत्रकार व दिव्यांग बांधवांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनंजय कोल्हे होते. प्रमुख पाहुणे दिलीप सूर्यवंशी यांनी पत्रकार व दिव्यांग बांधवाना मोलाचे मार्गदर्शन व दिव्यांग व सामाजिक बहुउद्देशिय संस्था (राहुल कोल्हे मित्र) परिवाराच्या कार्याचे कौतुक केले. पत्रकार संजय सराफ यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन करून सांगितले कि, राहुल कोल्हे मित्रपरिवार दरवर्षी न चुकता आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व युवा दिन व पत्रकार यांचा मोठया थाटात सन्मान करतात ही खूप कौतुकास्पद बाब आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था अध्यक्ष योगेश उर्फ मुन्ना चौधरी, विशाल दांडगे, पराग वारके, चिराग पाटील, चेतन तळेले, भगवान कोळी, स्वाती कोल्हे, रूपाली वारके हे सर्व एकजुटीने कार्य करीत असतात. या कार्यक्रमाला विशेष करून ९० टक्के दिव्यांग असलेले कमलेश देशमुख हे आसाम येथून स्वतः तीन हजार कि. मि. नॅनो गाडी चालवत कार्यक्रमाला आले होते.

या पत्रकारांचा झाला सन्मान- वासुदेव सरोदे, प्रा. उमाकांत पाटील, योगेश सोनवणे, निलेश पाटील, शेखर पटेल, संजय सराफ, अरुण होले, प्रा. राजेंद्र तायडे, फारुख शेख, शाकीर मलिक, राजू तडवी, सलीम पिंजारी, तसेच दिव्यांग बांधव अशोक कोळी, विनोद बिराडे या दोघं कुटुंबांना ब्लॅंकेट व त्यांच्या मुलांना स्कूल बॅग व व इतर दिव्यांगांना ब्लॅंकेट सुरेश चव्हाण यांना कुबड्या देण्यात आल्या. तर बाळू चौधरी यांना ब्लाइंड स्टिक दिली. संस्था अध्यक्ष योगेश उर्फ मुन्ना चौधरी यांनी संस्थेच्या कार्याबद्दल, तसेच दिव्यांग बांधवांच्या मुलांना शासनाच्या बाल संगोपन योजने बद्दल माहिती देऊन फॉर्म भरून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सराफ तर आभार मुन्ना चौधरी यांनी केले. यावेळी दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन जिल्हा सचिव हितेश तायडे, दिव्यांग बांधव ग्रामस्य उपस्थित होते.

Protected Content