क्रिप्टोकरन्सी वापरावरील बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय रिझर्व्ह बँकेने देशात क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारांवर आणलेली बंदी आज सुप्रीम कोर्टाने उठवली आहे. न्यायालयाने भारतामध्ये क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारांना परवानगी दिलीय.

 

आरबीआयने एप्रिल २०१८ मध्ये बिटकॉइनसारख्या आभासी चलनाच्या ट्रेडिंगवर बंदी आणली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवण्याचा निर्णय दिला. दरम्यान, जस्टिस आर. नरिमन, अनिरुद्ध बोस आणि व्ही. रामसुब्रह्मण्यम यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला. कोर्टात आपली बाजू मांडताना आयएमएआयच्या वकिलांनी सांगितले, की “मुळात क्रिप्टो करन्सी हे चलनच नाही. ती एक वस्तू आहे. अशात आरबीआयला त्यावर बंदी लावण्याचे अधिकार नाहीत. आरबीआयने क्रिप्टो करन्सीवर बंदी लावावी असा कायदा सुद्धा नाही, असा युक्तिवाद केला होता.

Protected Content