उद्धव ठाकरे पक्षाला खासगी कंपनी समजतात – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा |शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या सहकाऱ्यांना पक्षातील नेत्यांना स्वत:च्या सवंगड्यांप्रमाणे वागवत होते. मात्र, उद्धव ठाकरे पक्षाला स्वत:ची प्रायव्हेड लिमिटेड कंपनी समजतात. सहकाऱ्यांना ते घरगडी किंवा नोकर समजतात, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, माझे कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरतेच उद्धव ठाकरे मर्यादित आहेत. दौरा करायचा लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे. आमच्या स्वच्छता दौऱ्यामुळे पक्षातील अनेक वर्षांची घाण देखील साफ केली आहे. उद्धव ठाकरे स्वत:चे घर व्यवस्थित सांभाळू शकले नाहीत. घराणेशाही म्हणजे काय याची व्याख्या काय त्यांनी सांगितली पाहिजे. त्यांनी घरातील सर्वांना बाहेर काढले.

एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांचे राम मंदिर बांधण्याचे स्वप्न होते ते स्वप्न मोदीजींनी पूर्ण केलेले आहे. जगाला माहिती देशाला माहिती आणि यांचे राम मंदिराच्या बद्दल वेगळीच प्रेम आहे. ‘मंदिर वही बनायेंगे तारीख नही बतायेंगे’ असे म्हणून उद्धव ठाकरे चेष्टा करत होते. मात्र, आज नरेंद्र मोदींनी मंदिर बांधलेही आणि आता त्याचे उद्घाटनही होत आहे.

देर आये दुरुस्त आये असे म्हणत खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले आहे. हे सगळे आधीच केले असत तर, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या कल्याण संवाद दौऱ्यावर खासदार शिंदे यांनी टोला लगावला आहे.

खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, तब्बल सात तास त्यांनी माझ्या मतदारसंघासाठी दिलेले आहेत. कल्याण लोकसभेत कशा प्रकारचे काम झालेले आहे, हे देखील ते पाहतील. देर आये दुरुस्त आये… हे सर्व आधी केले असते, तर या सात तासाच्या दौऱ्याची परिस्थिती वेगळी असती. त्यांचे स्वागत माझ्या मतदारसंघात मी करतोय असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले आहेत.

Protected Content