पीएम केअर्स फंडमधील पैसा कुठे गेला?

 

 

कोलकाता : वृत्तसंस्था । ‘कोरोनाच्या काळात नागरिकांकडून गोळा केलेला ‘पीएम केअर्स फंड’मधील पैसा कुठे गेला,’ असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला.

देशातील संघराज्याचा ढाचा उद् ध्वस्त करण्यासाठी केंद्रातील सरकारने विविध सरकारी यंत्रणांचा उपयोग केला,’ असा आरोप करून त्या म्हणाल्या कि केंद्रातील सरकारच्या इशाऱ्यावर राज्य सरकार चालणार नाही. . कॅबिनेट बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

ममता म्हणाल्या, ‘पीएम केअर्स फंडातील पैसे कोठे गेले? या मदतीचे भवितव्य काय आहे ते कोणाला माहिती आहे का नाही? कोट्यवधी रुपयांचा पैसा कोठे गेला, त्याचा हिशेब सादर का गेला नाही, केंद्र सरकार राज्य सरकारला सल्ले देते; पण कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने काय केले, याबाबत मात्र कोणीही बोलत नाही.’ आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातही त्यांनी टिप्पणी केली. देशातील इतर राज्यांच्या तुलनेमध्ये पश्चिम बंगालमधील कायदा सुव्यवस्थेची स्थिती उत्तम असल्याचा दावाही त्यांनी केला.

ममता पुढे म्हणाल्या, ‘केंद्रीय यंत्रणांचा वापर धमकी देण्यासाठी केला जात आहे. आम्ही त्याला घाबरणार नाही. भाजप हा खोटे बोलणाऱ्या नेत्यांचा पक्ष आहे. नागरिकांना दिलेली आश्वासने दूर न करण्यातच त्यांना धन्यता वाटते. आम्ही सरकारशी दोन हात करायला कायमच तयार आहे.’ २९४ जागांच्या पश्चिम बंगाल विधानसभेसाठी पुढील वर्षी एप्रिल, मेमध्ये निवडणूक होणार आहे.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत त्या म्हणाल्या, ‘भाजपला या कायद्यांवरून कोणताही पक्ष पाठिंबा देताना दिसत नाही. शेतकऱ्यांना त्रास देण्यासाठीच हे कायदे आणले आहेत. भाजपच दडपशाहीच्या जोरावर हे कायदे पुढे रेटत आहे.’

पश्चिम बंगाल विधानसभा डोळ्यापुढे ठेवून तृणमूल काँग्रेसने ‘दुआरे सरकार’ (सरकार तुमच्या दारी) ही मोहीम आखली आहे. राज्य सरकारच्या विविध ११ कल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा , हा मोहिमेमागील हेतू आहे. मनरेगा, जॉबकार्ड, हेल्थकार्ड, जात प्रमाणपत्र आदी गोष्टी मिळण्यासाठी नागरिकांना मदत केली जाणार आहे.

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने सुरू केलेल्या या अभियानावर भाजपने टीका केली असून, हा एक निवडणुकीचा स्टंट असल्याचे म्हटले आहे. पक्षाच्या ट्विटर हँडलवरून ही टीका करण्यात आली आहे.

Protected Content