भंडारा जिल्हा रुग्णालय आग ; सिव्हिल सर्जनसह ६ जण निलंबित

 

मुंबई : वृत्तसंस्था । भंडारा जिल्हा रुग्णालय आग दुर्घटनेला जबाबदार ठरवत सिव्हिल सर्जन डॉ. प्रमोद खंडाते, वैद्यकीय अधिकारी अर्चना मेश्राम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. डॉ. सुनिता बडे यांची बदली करण्यात आली आहे. तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीनं केलेल्या तपासात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आग लागल्याचं समोर आलं आहे.

आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेडियंट हिटरमध्ये स्पार्क झाल्यानं आग लागली होती. रुम बंद आणि तिथं प्लास्टिक असल्यानं आग पसरली. रुग्णालयाचं फायर ऑडिट झालं नाही. आगीमागे ते कारणही आहे. उपस्थित असलेल्या डॉक्टर आणि नर्सनी कर्तव्यात कसूर केल्याचं दिसून आल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.

सुशील अबाते यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. नर्स ज्योती भास्कर, स्टाफ नर्स स्मिता आंबीददुलके आणि शुभांगी साठवणे यांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

Protected Content