Home क्राईम पारोळा येथे एकाच्या दुचाकीची चोरी; पोलीसात गुन्हा

पारोळा येथे एकाच्या दुचाकीची चोरी; पोलीसात गुन्हा


पारोळा प्रतिनिधी । शहरातील श्रीराम नगर येथून पार्किंगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्‍याची घटना उघडकीला आली असून पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, प्रवीण पंढरीनाथ पाटील (वय 44, रा. श्रीरामनगर) यांच्याकडे कामासाठी लागणारी दुचाकी (एमएच 19 सीएच 5345) आहे. दररोज कामासाठी या दुचाकीचा वापर करतात. दरम्यान 20 जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास ते कामावरून आले. दुचाकी राहत्या घराच्या वॉल कंपाऊंडमध्ये पार्किंग करून लावली. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याचे 21 जानेवारी रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास उघडकीला आली. आजूबाजू परिसरात दुचाकीचा शोध घेतला असता दुचाकी मिळून आली नाही. याप्रकरणी प्रवीण पाटील यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound