यंदा आरोग्य क्षेत्रात सर्वाधिक पगारवाढीची शक्यता

मुंबई : वृत्तसंस्था । यंदा पगाराची सर्वाधिक वाढ आरोग्य सेवा क्षेत्रात अपेक्षित आहे. ही सरासरी ८ टक्के असू शकते. यानंतर एफएमसीजी क्षेत्रातील वेतन ७ . ६ टक्के आणि ई-कॉमर्स / इंटरनेट सेवा क्षेत्रात ७ . ५ टक्के, तंत्रज्ञानात ७.. ३ टक्के आणि बँकिंग आणि वित्त सेवांमध्ये ६ . ८ टक्के वाढ होऊ शकते.

कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे २०२० सगळ्यांसाठीच आर्थिकदृष्ट्या कठीण गेलं. या काळात लाखो लोकांनी नोकर्‍या गमावल्या. पण २०२१ ची सुरुवात ही कोरोना लसीने झाल्यामुळे सगळं काही पुन्हा सुरळीत होताना दिसत आहे. अशात आता नोकरीच्याही उत्तम संधी चालून आल्या आहेत. देशात नवीन रोजगार येत असून कर्मचार्‍यांचे पगारही वाढण्याची शक्यता आहे.

२०२१ मध्ये अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढवणार आहेत. तब्बल ६० टक्के कंपन्यांना वेतनवाढीसह बोनस देण्याच्या विचारात आहे. सर्वेक्षण केलेल्या ३० टक्के कंपन्या अजूनही कर्मचाऱ्यांना लाभ द्यायचा की नाही यावर विचार करत आहेत.

ईटी मायकेल पेज टॅलेंट ट्रेंड्स २०२१ च्या मते, ५३ टक्के कंपन्यांना यावर्षी नवीन लोक नोकरीसाठी घेण्याचा विचार करत आहे. यासाठी आशिया-पॅसिफिकच्या १२ बाजारात केलेल्या सर्वेक्षणातून अहवालाचा निकाल घेण्यात आला आहे. यामध्ये ५५०० हून अधिक व्यापारी आणि २१००० कर्मचारी आहेत, त्यापैकी ३५०० पेक्षा अधिक संचालक किंवा सीएक्सओ यांचा समावेश आहे.

गेल्या वर्षामध्ये नोकऱ्यांमध्ये १८ टक्के घट झाल्याचं पाहायला मिळालं तर आता ५३ टक्के कंपन्या यंदा भारतात नवीन लोकांना कामावर घेण्याचा प्रयत्नात आहे. ईटीच्या दुसर्‍या अहवालानुसार टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजी आणि विप्रो या चार आयटी कंपन्या यावर्षी ९१ हजार लोकांना नोकर्‍या उपलब्ध करुन देऊ शकतात.

५५ टक्के कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांना बोनस देणार असून. त्यापैकी ४४ टक्के लोकांना कामगारांना महिन्याच्या पगारापेक्षा जास्त पगार बोनस म्हणून देण्याचाही विचार आहेत. तर ४६ टक्के लोकांना बोनसमध्ये एक महिना किंवा त्याहून कमी देण्यात येईल.

 

व्यावसायिक क्षेत्रामध्ये ७ . ७ टक्के, किरकोळ क्षेत्रात ६ . १ टक्के, वाहतूक व वितरणात ६ टक्के, औद्योगिक व उत्पादन क्षेत्रात ९ . ९ टक्के, नैसर्गिक संसाधने व उर्जेतील ९ . ९ टक्के आणि बांधकाम क्षेत्रातील ५ . ३ टक्के आर्थिक नफा होण्याची शक्यता आहे.

Protected Content