बोरगाव बु॥ येथील संरपचपदी मनिषा मराठे

manishha marathe

 

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील बोरगाव बु॥ येथील धोंडाबाई दगा मराठे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर सरपंचपदी मनिषा मराठे याची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

याप्रसंगी उपसंरपच रविंद्र मराठे, ग्रामपंचायत सदस्य भानुदास पाटील, धोडाबाई मराठे, वंदना पाटील, सुभाष शेंडगे, दमयंताबाई मराठे, भिकु सोनवणे, संगिता मराठे, ग्रामसेवक रोहिनी महाले तथा ग्रामस्थ उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्कल बाविस्कर यांनी काम पाहिले.

Protected Content