हैद्राबाद प्रकरणातील मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या – मुस्लीम समाजाची मागणी

chalisagaon

 

चाळीसगाव प्रतिनीधी । हैद्राबाद येथे डॉ. प्रियंका रेड्डी यांच्यावर बलात्कार करुन त्यांना जिवंत जाळणाऱ्या नराधम आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी येथील मुस्लीम समाजाच्या वतीने आज तहसिलदार अमोल मोरे व शहर स.पो.नि आशीष रोही यांना करण्यात आली आहे.

दिलेल्या निवेदनानुसार, चारही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, जेणे करुन पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा घडणार नाही व याप्रकारचा अत्याचार इतरांवर होणार नाही. कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरुन बलात्कारींवर कठोर कारवाई झाली तर अशा घटना होणार नाहीत म्हणुन आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मुस्लीम समाजाच्या वतीने करण्यात आली असुन निवेदनावर मुस्लीम समाजाचे शेख अल्लाउद्दीन, शेख चिरगुद्दीन, कैसर खाटीक, भाजपाचे अरुण पाटील, भुषण पाटील, राजु पगार, विवेक चौधरी, सचिन आव्हाड, वसीम शेख, गफ्फार शेख, तय्यब सेठ, जहीर अली, लुकमान मिर्झा, राजु भाई, सैय्यद मेहमुद यांच्या सह्या आहेत.

Protected Content