जळगावात ट्रकची कारला जोरदार धडक; सुदैवाने चालक बचावला

Accident

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रिंगरोडवरून अवजड वाहनांना बंदी असतांना सिमेंटच्या गोण्या भरलेला ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याची घटना आज सकाळी 11 वाजता बहिणाबाई चौकात घडली. या अपघातात सुदैवाने कारचालक बचावला आहे. ट्रकने दिलेल्या धडकेत कारला 15 फुटापर्यंत फरफटत नेली.

याबाबत माहिती अशी की, रिंगरोडवर अवजड वाहनांना पुर्णपणे बंदी असतांना सिमेंटच्या गोण्याने भरलेला ट्रकने कार क्रमांक (एमपी ०४ सीजे ००६६) क्रमांकाची कार महाराणा प्रताप पुतळ्याकडून जात असताना धडक दिली. ट्रकचे ब्रेक वेळेवर न लागल्यामुळे कार तब्बल १५ फुटपर्यंत फरफटत नेली. सुदैवाने कार पलटी न झाल्यामुळे चालकास दुखापत झाली नाही. परंतू, कारच्या मागच्या दरवाजासह मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा अपघात पाहणाऱ्या नागरीकांच्या हृदयाचा ठोका चुकला होता. अपघातात कारचालक बचावल्यामुळे लागलीच लोकांनी त्यांना कारच्या बाहेर काढले. यावेळी चौकात प्रचंड गर्दी झाली होती. अपघातानंतर दोन्ही वाहनचालक जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गेले होते. आपसात तडजोड करुन वाद मिटवण्यात आला. त्यामुळे पोलिसांत गुन्हा दाखल झाला नाही. प्रवेश बंदी असलेल्या मार्गावरुन ट्रकचालक वाहतूक करीत असून देखील जिल्हापेठ पोलिसांनी त्याच्याविरुद्ध काहीच कारवाई केली नाही. असा रोष नागरीकांनी व्यक्त केला.

Protected Content