दुचाकीस्वाराच्या मृत्यू प्रकरणी कारचालकावर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी कार चालकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शरद तोताराम सोनवणे रा. कांचन नगर हे कॅटरींगच्या व्यवसायात कामाला होता. नेहमीप्रमाणे ६ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ६ वाजता कामावर दुचाकी (एमएच १९ एफ ८९२५) घरातून गेले. नेरी नाक्याकडून जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या तवेरा (एमएच १९ एएक्स ०१८०)ने जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती पत्नी गंगुबाई सोनवणे व नातेवाईकांना कळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. अंत्यसंस्कार केल्यानंतर आज मयताची पत्नी गंगूबाई सोनवणे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात कारचालकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Protected Content