उभ्या कपाशी पिकावर अज्ञाताने फवारले तणनाशक

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतात कोणीही नाही याचा फायदा घेत पाचोरा तालुक्यातील आर्वे येथे एका अज्ञात व्यतीने आर्वे शिवारातील तीन शेतकऱ्यांच्या उभ्या कपाशी पिकावर तणनाशक फवारल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

यामुळे रमेश काशीराम पाटील, नवाब तडवी, लतिफ तडवी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलिसांनी या अज्ञात व्यक्तीचा व झालेल्या प्रकारचा तपास करून तात्काळ गुन्हा दाखल करावा तसेच महसूल प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांच्या शेताचा पंचनामा करून त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळऊन द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

तणनाशक कोणी फवारले ? वा त्याला कुणी सांगितले ? की त्याने स्वतः हे कृत्य केले ? याचा तात्काळ तपास करण्याची मागणी रमेश पाटील, लतिफ तडवी, नवाब तडवी या शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच अशा माथेफिरूचा शोध लावुन त्यास योग्य ते शासन करावे, अशी मागणी परिसरातील इतर शेतकऱ्यांनी केली असून घडलेल्या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Protected Content