मोबाईलमध्ये रिचार्ज करण्यावरून दाम्पत्याला मारहाण

भुसावळ बाजारपेठ पोलीसात दोन जणांवर गुन्हा दाखल

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कुमार किरणा दुकानासमोरील रोडवर असलेल्या एका दुकानावर मोबाईलमध्ये रिचार्ज न झाल्याने पैसे परत मागितल्याच्या कारणावरून दाम्पत्याला शिवीगाळ व मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुस्तकीन शेख मुक्तार (वय-२४) रा. शिवाजी नगर, आगाखान वाडा, भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी ८ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता मुस्तकीन शेख हे मोबाईलमध्ये रिचार्ज करण्यासाठी शहरातील कुमार किराणा दुकानाजवळील एका दुकानात गेले. दरम्यान, मोबाईलमध्ये रिचार्ज आले नाही म्हणून मुस्तकीन शेख मुक्तार यांनी दुकानदार फरहान शेख नसिम याला रिचार्जचे पैसे मागितले. याचा राग आल्याने दुकानदार फरहान शेख नसिम आणि फरदीन शेख नसीम दोन्ही रा. आगाखान वाडा, भुसावळ यांनी मुस्तकीन शेख व त्यांची पत्नी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. यात मुस्तकीन हे जखमी झाले. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात मुस्तकीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता संशयित आरोपी  दुकानदार फरहान शेख नसिम आणि फरदीन शेख नसीम दोन्ही रा. आगाखान वाडा, भुसावळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अन्वर शेख करीत आहे.

Protected Content